हिंदू धर्मातील सण हे ऋतू आणि ज्योतिषाचा विचार करून निश्चित केले आहेत. परंतु कालपरत्वे या सणांमागील विचार विसरून केवळ कर्मकांडाला आणि त्यातील मजेला प्राधान्य आले आहे. काहीवेळा ही कारणे पुराणातील गोष्टी/कहाण्या यांच्या रुपकांमध्येही हरवली आहेत. गणेश चतुर्थी हा ही एक असाच सण! या लेखात गणेशोत्सवामागील ज्योतिषात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे समाधानकारक उत्तरे आहेत आणि कुठे नवीन प्रश्न!
गणेशोत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून सुरु होतो तो त्या महिन्यातील शुक्ल चतुर्दशीपर्यंत चालतो. प्रत्येकच महिन्यातील चतुर्थीला गणपतीच्या नावाने व्रत/उपास करतातच. ह्या प्रथेची सुरुवात गणपती आणि चंद्राच्या कथेत आढळते. तुडुंब पोटभरून जेवून उंदरावरून निघालेल्या गणपतीची चाल पाहून चंद्र त्याला हसला. त्यामुळे गणपती रागावला आणि पुढील घटनांची परिणती चंद्राला कलांचा भोग मिळण्यात झाली, त्यातही चतुर्थीला चंद्रदर्शन करणार्यांवर खोटा आळ येईल असे सांगितले. या गोष्टीला ज्योतिषातील काही बाबी जवळच्या वाटतात, त्या पुढीलप्रमाणे,
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।

- मंगळ ह्या पहिल्या बाह्य ग्रहाची पृथ्वीसापेक्ष गती गमतीशीर आहे - हा ग्रह साधारणपणे दीड महिन्यात एक रास, म्हणजे क्रांतीवृत्तावरचे ३० अंश ओलांडतो. या वेळी त्याच्या भासमानभ्रमणाची दिशा चंद्रसूर्यांच्या भासमानभ्रमणाच्या दिशेप्रमाणे असते. परंतु साधारण दर दोन वर्षांनी ती दिशा विपरीत होते (ज्योतिषाच्या भाषेत मंगळ वक्री होतो). त्यावेळी त्याला एक रास ओलांडायला साधारण पाच महिने लागतात, म्हणजे गती साधारण तिपटीने कमी होते. हा एकच ग्रह असा अाहे की ज्याच्या वक्री आणि सरल गतीत एवढा फरक आहे. ज्योतिषानुसार गणपतीला मंगळाची देवता मानतात. त्याचे वाहन उंदीर. उंदराची सामान्य गती खूप जास्त असते पण तुडुंब पोट भरलेल्या गणपतीला वाहून नेताना मात्र ती एकदम कमी झाल्यास नवल कसले आणि ते पाहून सर्वात गतिवान असलेला ग्रह चंद्र हसला तर नवल ते काय? चंद्राच्या कला आणि मंगळाची मंद विपरीत गती यांचा संबंध असल्याचे सूचित होते पण सध्याच्या ज्योतिर्विज्ञानात हा संबंध सापडत नाही.
- चंद्र आणि शुक्र, बुध हे अंतर्ग्रह यांच्या कला दिसतात. मंगळ हा सूर्यापासून पहिला ग्रह अाहे ज्याच्या कला दिसत नाहीत. त्यामुळे मंगळाच्या, पर्यायाने गणपतीच्या शापाने त्या कला दिसतात म्हणण्यात कथालेखकाचा उत्तम कल्पनाविलास दिसतो.
- एक तिथी म्हणजे चंद्राचे सूर्यापासून १२ अंशांचे अंतर असते. प्रथमा ० ते १२ अंश, द्वितीया १२ ते २४ अंश, तृतीया २४ ते ३६ अंश, चतुर्थी ३६ ते ४८ अंश आणि पंचमी ४८ ते ६० अंश. यापैकी चतुर्थीला (खरेतर काही तृतीयेचा काळ आणि काही पंचमीचा काळ) चंद्रापासून सूर्य (म्हणजे चंद्राच्या प्रकाशाचा स्त्रोत) ३० अंशांपेक्षा जास्त मागे असतो, म्हणजेच ज्योतिषानुसार व्ययभावात असतो. व्ययभाव हा तुरुंग, आरोप, खोटे आळ, मानहानी यांचा कारक आहे. हेच चतुर्थीच्या चंद्राला पाहिल्यावर चोरीचा आळ येतो या समजुतीमागचे कारण असावे. ज्योतिषानुसार चोरीचा आळ यायला एवढेच पुरेसे नाही आणि दरवेळी चतुर्थीचा चंद्र पाहून चोरीचा आळ येत नाही हे आपण आपलेही अनुभवू शकतो.
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।
गणपती हा चार हातांपैकी दोन हातात शस्त्र, तिसऱ्या हातात असुराशी युद्ध करताना तुटलेला दात, लाल रंगाचा, लाल गोष्टी आवडणारा असा युद्धाचा देव आहे. मंगळ हा ज्योतिषानुसार युद्धाचा कारक आणि लाल ग्रह आहे. फक्त मंगळ हा काटक, बलवान असा दाखवला आहे तर गणपती स्थूल!
गणपती आणि मंगळाच्या या ज्योतिषातील संबंधामुळे, चतुर्थीचा मंगळाशी संबंध आला ती विशेष होते, उदा. चतुर्थी मंगळवारी आली की अंगारक योग होतो. भाद्रपद महिन्याची पौर्णिमा पूर्वाभाद्रपदा किंवा उत्तराभाद्रपदा या नक्षत्रांमध्ये असते (म्हणून महिन्याचे नाव भाद्रपद). पौर्णिमेच्या आधी साधारण ११ दिवस चतुर्थी असते. चंद्र साधारण एका दिवसात एक नक्षत्र ओलांडतो, ११ दिवसांत मागे ११ नक्षत्रे मागे गेल्यास ल्यास, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवसभरात कधीतरी चंद्र चित्रा या मंगळाच्या नक्षत्रात असतो. दिवसापेक्षा नक्षत्र अधिक फलदायी त्यामुळे हा मुहूर्त गणपतीपूजेसाठी अंगारक योगापेक्षा जास्त फलदायी (अर्थात इतर ग्रहस्थितीनुसार फरक पडतोच). म्हणून या मुहूर्तावर गणेशाची एकापेक्षा जास्त दिवस उपासना करायचे व्रत सुरु होते.
असेच चतुर्थीला मंगळाचे नक्षत्र वैशाख (मृग नक्षत्र) अाणि पौष महिन्यात (धनिष्ठा) येते, पण त्या वेळी काही विशेष व्रत होत नाही. यामागे कदाचित तेव्हाचे ऋतू कारणीभूत असतील किंवा चित्रा नक्षत्रात काहीतरी विशेष असेल, ज्याची हे व्रत या महिन्यात योजणाऱ्यांना माहिती होती आणि आता ती विस्मृतीत गेली आहे.
त्याचबरोबर चतुर्थीचा आणि गणपतीचा संबंध काय किंवा चतुर्थी गणपतीला का प्रिय याचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही. एका त्रोटक संदर्भाप्रमाणे ज्याप्रमाणे ग्रहांना देवता दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे तिथींनाही देवता आहेत आणि चतुर्थीची देवता गणपती आहे. ग्रहांचा देवतांशी संबंध लावताना, ग्रह आणि देवता यांच्या गुणधर्मातील साम्य वरीलप्रमाणे लक्षात घेतले आहे. परंतु तिथी ही चंद्रसूर्यातील अंशात्मक अंतरावरून ठरते, ज्यावरून ग्रहयोग ठरवतात. ग्रहयोगांचे गुणधर्म त्या त्या ग्रहांवर अवलंबून असतात. चंद्रसूर्यातील अर्धकेंद्रयोग (४५ अंशाचा योग, जो चतुर्थीला होतो) अाणि गणपती यांत कुठले साधर्म्य आहे याचे विश्लेषण मला सापडले नाही.
गणेशोत्सवामागचे किंवा गणेशोत्सवदर्शित ज्योतिष शोधण्याचा माझा हा अल्प प्रयत्न. यातील बरीच माहिती वेगवेगळी विखुरलेली मिळाली ती इथे एकत्र केली आहे. याबद्दल अधिक माहितीचे, मतांचे स्वागत आहे.
संदर्भ:
१. दाते पंचांग, कृष्णमूर्ती पंचांग
२. कुंडली तंत्र आणि मंत्र - भाग १, व. दा. भट