निरयन राशींचे कारकत्व
रास | तत्त्व | रंग* | जागा* |
---|---|---|---|
मेष | अग्नि | रक्तवर्ण | कुरणे, वाळवंट, डोंगराळ प्रदेश, चोरांच्या लपण्याच्या जागा, छत, गिलावा, लहान गुरांचे गोठे, नुकतीच नांगरलेली जमीन |
वृषभ | पृथ्वी | गौर | तबेला, गोठे, फर्निचरची दुकाने, घरांपासून दूर असलेली कुरणे, जंगलतोडीच्या जागा, तळघरे, बुटक्या खोल्या, लाकडी कपाटे |
मिथुन | वायु | पोपटी | भिंती, पेट्या, पेटारे, धान्य साठवण्याच्या जागा, टेकड्या, नाट्यगृहे, भोजनगृहे, शाळा, शिकण्याची ठिकाणे |
कर्क | जल | पांढरा, तांबूस | ओढे, नद्या, तलाव, झरे, पाणथळ जागा इ. पाण्यासंबंधीत जागा, दुध साठवण्याच्या जागा, वाहने अाणि ती ठेवण्याच्या जागा |
सिंह | अग्नि | केशरी, लाल | उंच पर्वत, जंगली पशु राहत असलेल्या जागा, खडबडीत रस्ते, राजवाडे, किल्ले, सरकारी इमारती, मनोरंजनाच्या अाणि चैनीच्या जागा, शेअरबाजार, सोन्याच्या खाणी, टांकसाळ, भट्टी, चूल, स्वयंपाकघर, घरातील मनोरंजनाच्या अाणि चैनीच्या जागा |
कन्या | पृथ्वी | हिरवा, चित्रविचित्र | बागा, माळ, पिके असलेली जमीन, धान्य, फळे, भाज्या साठवण्याच्या जागा, उपाहारगृहे, पुस्तकांची कपाटे, प्रथमोपचार पेटी, औषधांची पेटी, ग्रंथालये |
तूळ | वायु | निळासर काळा | पवनचक्क्यांची जागा, पडघर, माजघर, टेकड्यांचे उतार, स्वच्छ, शुद्ध हवा असलेल्या जागा, पर्वतमाथा |
वृश्चिक | जल | लाल | तीव्र वासाचे पाणी, द्रवपदार्थ असलेल्या जागा उदा. रसायनांचे कारखाने, त्यांच्या साठवणूकीच्या जागा, गटारे, दलदल, स्वच्छतागृहे. सापटीतल्या जागा, घळी, फटी इ. चिंचोळ्या आणि खोल जागा. कत्तलखाने |
धनु | अग्नि | पिंगट | टेकड्या, घरातील सर्वात उंचीवरची खोली, भट्टीजवळची जागा, निरोगी घोड्यांचे तबेले, स्फोटके, शस्त्रे ठेवायची जागा, धार्मिक स्थळे, शाळा, महाविद्यालये, विश्वविद्यालये, न्यायालये |
मकर | पृथ्वी | काळसर पिवळा | तिजोरी, एकाकी जागा, दभनभुमी, शवागार, थंड जागा, नापीक जमीन, गर्दीच्या जागा, तळघरे, जुन्या इमारती, जमीनीलगतच्या जागा |
कुंभ | वायु | गडद पिंगट | उंच, ओहोळांच्या जागा, गुहा, खाणी, उत्खनन केलेल्या जागा. बोगदे, खिडक्या, ध्वनी निर्माण करणारी उपकरणे असलेल्या जागा. पायऱ्या, शिड्या |
मीन | जल | समुद्री हिरवा/निळा | तळी, समुद्र, मत्स्यालये, धरणे, पुराच्या जागा. धार्मिक स्थळे, बंदरे, मनोरुग्णालय, रुग्णालये, वृद्धालये, तुरुंग, अाश्रम, झोपण्याची खोली |
राशी त्यांच्या तत्वाप्रमाणेही स्थाने दाखवतात. जलतत्त्वाच्या राशी पाण्याची ठिकाणे, अग्नि तत्त्वाच्या राशी ऊष्ण ठिकाणे, वायुतत्त्वाच्या राशी मोकळी, हवेशीर, वारा असलेली ठिकाणे, पृथ्वीतत्त्वाच्या राशी जमिनीलगतची, लाकूड, धातू वगैरे जड वस्तूंनी युक्त ठिकाणे दाखवतात. ह्या तत्त्वांची तीव्रता किंवा प्रमाण मेषेपासून मीनेपर्यंत वाढत जातो. कर्क राशीने दाखवलेल्या जागी असलेले पाणी किंवा द्रव हे वृश्चिकेपेक्षा कमी प्रमाणात तर वृश्चिकेने दाखवलेले द्रव मीनेपेक्षा कमी प्रमाणात असते. कर्क रास लहान डबके दाखवेल तर मीन समुद्र. मिथुन एखादा मोकळ कप्पा दाखवेल तर कुंभ खिडकी किंवा उघडा कप्पा दाखवेल.
संदर्भ:
१ कुंडली तंत्र अाणि मंत्र (भाग पहिला), प्रकरण पाचवे - व. दा. भट
२ Fundamental Principals of Astrology (Hindu, Western, Stellar), Second Reader - Prof. K. S. Krushnamurti
*राशीचे तत्त्व, निसर्ग कुंडलीतले भाव आणि त्यांच्या स्वामींचे कारकत्त्व यांवरून जागा आणि रंग ठरतात, वरील रकान्यांत त्याची काही उदाहरणे दिली आहेत.
*राशीचे तत्त्व, निसर्ग कुंडलीतले भाव आणि त्यांच्या स्वामींचे कारकत्त्व यांवरून जागा आणि रंग ठरतात, वरील रकान्यांत त्याची काही उदाहरणे दिली आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा