ग्रह

ग्रहांचे कारकत्व

ज्योतिषात ग्रह याचा अर्थ planet हा नसून एक धारणा (concept) असा आहे. ज्योतिषातील ग्रहांच्या यादीत रवि हा तारा, त्याच्या भोवती‌ आणि त्याच्यापासून निर्माण झालेले सगळे गोल, चंद्र हा पृथ्वीचा उपग्रह, राहु आणि केतू‌ हे गणिती‌ बिंदू (ज्यांना पदार्थरुपात अस्तित्व नाही) यांचा समावेश आहे. यातील प्रत्येक ग्रह एक विशिष्ट गुणसमूह किंवा धारणा दाखवतो. हा अर्थ माहित नसल्यामुळे ज्योतिषांना ग्रह, तारे आणि उपग्रह यांतील भेदसुद्धा कळत नाही असा एक हास्यास्पद आरोप होताना दिसतो. असो, त्यांचे कारकत्व पुढील तक्त्यात दिले आहे.

ग्रह नाते रंग राजदरबारातील स्थाने
रवि पिता केशरी, ताम्र राजा
चंद्र माता पांढरा राजमाता, स्त्री आणि बाल प्रजा
मंगळ भाऊ (स्त्रियांसाठी पती) लाल, रक्तवर्ण सेनापती
बुध मामा हिरवा युवराज
गुरु संतति, गुरु पिवळा गुरु, मंत्री
शुक्र पत्नी/पती चित्र राणी
शनि सेवक, वृद्ध कृष्ण दास
राहु - धुरकट, पारदर्शक गुप्तशत्रू
केतू संन्यासी केशरी, भगवा संन्यस्तजन, मुनी
हर्षल (Uranus) - - -
नेप्चून - समुद्री हिरवा/निळा -
प्लुटो - - -

संदर्भ

  1. Fundamental Principals of Astrology (Hindu, Western and Stellar) - Prof. K. S. Krishnamurti
  2. कुंडली तंत्र आणि मंत्र (भाग पहिला)‌ - व. दा. भट

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा