भाव (स्थाने)

भावांचे कारकत्त्व

जन्मपत्रिका किंवा जन्मकुंडली साधारणपणे सोबत दिलेल्या आकृतीप्रमाणे दिसते. भारतात वेगवेगळ्या पद्धतीने कुंडल्या काढल्या जातात. बहुतेक उत्तर आणि मध्य भारतात खालीलप्रकारे कुंडली काढली जाते. कुंडलीत बारा घरे किंवा भाव किंवा स्थाने असतात. त्या त्या स्थानांची नावे आकृतीत दाखवली आहेत. बहुतेक भाव हे त्यांच्या संख्येवरून ओळखले जातात, पण काही भाव त्यांच्या कारकत्त्वानुसारही ओळखले जातात, ती नावे कंसात दाखवली आहेत. लाभ आणि व्यय हे अनुक्रमे अकरावे आणि बारावे भाव मात्र त्यांच्या संख्यावाचक नामापेक्षा कारकत्त्वानुसार जास्त ओळखले जातात. म्हणून त्यांची प्रचलित नावेच दिली आहेत. पुढील तक्त्यात ह्या भावांचे कारकत्त्व दिले आहे.
भाव नाते शरीराचे भाग जागा
प्रथम व्यक्ती स्वत: डोके, कपाळ इ. चेहऱ्याचा वरचा भाग व्यक्ती स्वत:
धन घराणे, जवळचे नातेवाईक डोळे ((विशेषत: उजवा) आणि चेहऱ्याचा खालचा भाग, वाणीसंबंधी अवयव पैसे, दागिने ठेवायच्या जागा, तिजोरी, वंशपरंपरागत घर, जमीन
तृतीय भावंडे, विशेषत: ज्येष्टानुज (पाठोपाठ जन्मलेले भावंड) कान (विशेषत:‌ उजवा), हात, खांदे, मान आणि मज्जासंस्था घराजवळची जागा, लिखाण किंवा संपर्काची साधने असलेल्या जागा
चतुर्थ आई छाती, फुफ्फुसे, श्वसनसंस्था व्यक्तीचे राहते घर, वाहने
पंचम संतति, विशेषत: प्रथम संतति पाठ, हृदय मुलांच्या खोल्या, करमणुकीच्या जागा, चैनीच्या वस्तू ठेवायच्या जागा
षष्ठ मामा, आजोळ जठर, यकृत, आतड्यांचा जठराला जोडलेला भाग औषधे ठेवायच्या जागा
सप्तम पती/पत्नी, धंद्यातील किंवा करारातील भागीदार, सध्याच्या काळातील Manager, Boss लहान, मोठी आतडी, मुत्रपिंड, मुत्राशय, कंबर, नितंब समोरची‌ व्यक्ती
अष्टम - गुह्यांग, गुदद्वार, जननेंद्रिये सापटीतल्या जागा, स्मशाने, दफनभुमी इ.
नवम गुरु, शिक्षक, वडिल (वेदिक पद्धतीने) मांड्या, गुप्तांगाला जोडलेला पायाचा भाग धार्मिक जागा, विश्वविद्यालये
दशम स्वामी, राजा, वडिल (पाश्चिमात्य पद्धतीप्रमाणे) गुडघे रोजच्या कामाची जागा
लाभ मित्र, अंत्यज (लगेचचे मोठे भावंड) डावा कान, घोटे

व्यय - पाय, चवडे, टाचा, डावा डोळा झोपायची खोली

ठराविक एक भाव हा लग्न किंवा प्रथमभाव समजून, त्यापासून इतर भाव हे त्या ठराविक भावासंबंधी ते ते कारकत्त्व दाखवतात. उदा. दशमभाव हा सप्तमापासून चतुर्थ भाव आहे, त्यामुळे आपल्या भागीदाराचे घर तो दाखवतो. याच न्यायाने षष्ठ स्थान, जे चतुर्थ स्थानाचे तृतीय स्थान आहे, ते आईच्या भावाचे म्हणजे मामाचे नाते दाखवते.

संदर्भ:

१ कुंडली तंत्र अाणि मंत्र (भाग पहिला), प्रकरण पाचवे - व. दा. भट
२ Fundamental Principals of Astrology (Hindu, Western, Stellar), Second Reader - Prof. K. S. Krushnamurti

1 टिप्पणी: