फलज्योतिषाचा सर्वात सोपा आणि खूप वेळा करावा लागणारा उपयोग म्हणजे हरवलेल्या वस्तू शोधणे. निदान आपल्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी तरी ज्योतिषाचा अभ्यास जरूर करावा. बऱ्याचदा एखादी वस्तू डाव्या-उजव्या हाताने किंवा पुन्हा लागली तर "सापडायला सोप्या" अशा विवक्षित ठिकाणी आपण ठेवतो, नंतर जेव्हा त्या वस्तूची अत्यंत गरज असते तेव्हा ती विवक्षित जागाच "सापडत" नाही; ऐन मोक्याच्या वेळी आपली स्मरणशक्ती दगा देते. वस्तू हरवल्या किंवा सापडत नसल्या की कुठे शोधायला सुरुवात करावी इथपासून सुरुवात असते. अशा वेळी, अगदी लहान वाटणारी आपली खोलीदेखील, जगाएवढी भासायला लागते. जर घरात ज्योतिषाची प्राथमिक माहिती असलेली व्यक्ती असेल तर निदान ती वस्तू कुठे असेल, याचा सुगावा ती व्यक्ती देऊ शकते.
पद्धत
हरवलेल्या वस्तू सापडवण्याच्या अनेक पद्धती ज्योतिषात आहेत, त्यापैकी माझ्या दृष्टीने सोपी आणि जास्त बरोबर उत्तरे देणारी पद्धत येथे देत आहे.
ज्योतिषाला जेव्हा अमूक वस्तू कुठे सापडेल, असा प्रश्न केला जातो, तेव्हा त्या वेळची, ज्योतिषी जिथे असेल त्या स्थळाची कुंडली मांडून, त्या कुंडलीतील चंद्राच्या स्थानावरून, हरवलेली वस्तू कुठे असेल त्याचा अंदाज बांधावा. हा अंदाज बांधताना, चंद्राच्या स्थानाचा खालीलप्रमाणे उपयोग करावा -
ज्योतिषाला जेव्हा अमूक वस्तू कुठे सापडेल, असा प्रश्न केला जातो, तेव्हा त्या वेळची, ज्योतिषी जिथे असेल त्या स्थळाची कुंडली मांडून, त्या कुंडलीतील चंद्राच्या स्थानावरून, हरवलेली वस्तू कुठे असेल त्याचा अंदाज बांधावा. हा अंदाज बांधताना, चंद्राच्या स्थानाचा खालीलप्रमाणे उपयोग करावा -
- चंद्राचे कारकत्त्व - ही प्रश्नकुंडली असल्याने, चंद्र हा हरवलेल्या वस्तूशी संबंधित भावाचा कारक असावा लागतो. उदा. सोन्याचे दागिने हरवल्यास धनभाव, मंगळसूत्र हरवल्यास अष्टमभाव, कागदपत्रे हरवल्यास तृतीयभाव इ. त्यामुळे बऱ्याचदा कर्क रास किंवा चंद्र स्वत: त्या वस्तूशी संबंधित भावात दिसतो. तसा तो कारक नसल्यास, ही कुंडली हरवलेल्या वस्तूची जागा सुचवण्यास उपयोगी नसते.
- चंद्राचा भाव - चंद्र ज्या भावात असेल त्या भावानुसार वस्तूचे ठिकाण योजावे. उदा. पंचमभावात असेल तर स्वत:च्या मुलांकडे किंवा खेळणी ठेवायच्या जागी, व्ययात असेल तर झोपायच्या खोलीत वगैरे. भावानुसार जागा कशा योजाव्यात ह्याची माहिती इथे पहा.
- चंद्राची रास - भावाप्रमाणेच रासही वस्तूचे ठिकाण सुचवते. रास आणि भाव या दोन्ही गोष्टींचा विचार तारतम्याने करावा लागतो. त्याचबरोबर रास आणि चंद्राचे नक्षत्र ती वस्तू जर एखाद्या वेष्टनात, पिशवीत किंवा पेटीत असेल तर त्या वेष्टनाचा रंगही दाखवते. राशीनुसार जागा कशा योजाव्यात हे इथे पहा. उदा. चंद्र मीन राशीत व्ययभावात असेल तर रास अाणि भाव दोन्ही झोपण्याची जागा दाखवतात. अशावेळी, झोपण्याच्या खोलीत, हिरव्या रंगाच्या पिशवीत किंवा पाण्याच्या भांड्याशेजारी वस्तू असण्याची शक्यता असते.
- चंद्राचे नक्षत्र - राशीप्रमाणे नक्षत्र वस्तूच्या आच्छादनाचा रंग दाखवते. तसेच कधी ते वस्तूशी संबंधित व्यक्ती दाखवते. चंद्र ज्या नक्षत्रात अाहे, त्याच्या स्वामीनुसार रंग किंवा व्यक्तीची योजना असते.
- चंद्राचा नवमांश - चंद्र ज्या नवमांशात आहे, त्याचा उपयोग रास आणि भावाने दाखवलेली जागा अधिक सूक्ष्म करण्यास करावा. त्याची योजना राशीच्या कारकत्वाप्रमाणेच करावी.
- चंद्राबरोबर किंवा त्याच्याशी योग करणारे ग्रह - ग्रह साधारणपणे हरवलेली वस्तू ज्या जागी आहे, त्याच्या आसपासच्या इतर वस्तू दाखवतात. प्रत्येक ग्रहाच्या कारकत्त्वानुसार आणि रंगानुसार या वस्तू योजाव्यात. ग्रहांचे कारकत्व आणि रंग इथे पहा.
या पद्धतीचे यशापयश
माझ्याकडे असलेल्या एकूण २३ हरवून नंतर सापडलेल्या वस्तूंबाबतच्या प्रश्नकुंडल्या आहेत; पैकी १२ वेळा वस्तू वर सांगितल्याप्रमाणे सापडल्या आहेत. ही संख्या ह्या पद्धतीची परिणामकारकता अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.
ह्या लेखात वस्तू मिळेल का ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे ह्यासंबंधी माहिती नाही. ती माहिती पुऩ्हा कधीतरी लिहीन.
ह्या लेखात वस्तू मिळेल का ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे ह्यासंबंधी माहिती नाही. ती माहिती पुऩ्हा कधीतरी लिहीन.
उदाहरणे
प्रश्न विचारण्याची वेळ, स्थळ | चंद्राचे स्थान | चंद्राचे ग्रहांशी योग | वस्तू सापडलेली जागा | |||
भाव | रास | नक्षत्र | नवमांश | |||
27/Jun/2012 21:29:00, पुणे | अष्टम | कन्या | हस्त | मिथुन | मंगळ, शनि | जमिनीलगतचे (कन्या) पुस्तकांचे कपाट (मिथुन), लाल (मंगळ) आणि काळ्या (शनि) रंगाच्या वस्तूंच्या मधल्या सापटीत (अष्टम) |
22/Mar/2012 19:32:00, पुणे | षष्ठ | मीन | उ.भा. | कन्या | रवि, बुध | झोपायच्या खोलीत (मीन रास), जमिनीलगतच्या कपाटात (कन्या नवमांश), इतर कागदपत्रांबरोबर (बुध) ज्यात सरकारी कागदपत्रं (रवि) होती |
14/Apr/2014 10:14:00, पुणे | चतुर्थ | कन्या | हस्त | मिथुन | मंगळ, गुरु | कपाटात औषधांच्या डब्याजवळ (कन्या), पांढऱ्या रंगाच्या (हस्त) पिशवीत, लाल पिशवीजवळ (मंगळ), रिकाम्या कप्प्यात (मिथुन) दासबोध (गुरु) असलेल्या खोलीत |
3/Jul/2013 19:44:00, पुणे | व्यय | मेष | अश्विनी | मिथुन | शनि, बुध, रवि, केतू | झोपायच्या खोलीत (व्यय), छताजवळ (मेष), लाल रंगाच्या पेटीत, काळ्या (शनि), केशरी (केतू) पिशव्यांबरोबर, औषधांबरोबर (रवि, बुध) |
महिन्याभरापूर्वी मंगळसूत्र कपाटात ठेवलं होतं. खूप शोधलं पण सापडत नाहीए...कुठे शोधावे
उत्तर द्याहटवामी नुसत्या टीपेवरून हे सांगण्याचा प्रयत्न पहिल्यांदाच करत आहे. ही टीप १२ नोव्हेंबर २०२० रोजी १:३७ वाजता टाकलेली दिसते. ती वेळ घेऊन कुंडली मांडली असता त्यातून खालील जागी शोधावे असे दिसते. ज्या कपाटात तुम्ही ते ठेवलेत तिथे एखादे पुस्तक किंवा पुस्तके असतील तर त्याच्या आजूबाजूला, पुस्तकात, किंवा त्या कपाटात औषधे असतील तर त्याच्या आजूबाजूला किंवा त्या पेटीत किंवा पिशवीत. हे पुस्तक, पेटी अथवा पिशवी पांढऱ्या रंगाची असावी. कपाटातील जमिनीलगतच्या कप्प्यांमध्ये सापटीत ते असेल. त्याबरोबर स्त्रियांनी वापरायच्या वस्तू असतील.
हटवामाझ्या लेकीचा चांदीचा चमचा हरवलाय कदाचित चोरीला गेलाय पण नक्की कधी ते माहीत नाही. खूप हौसेने घेतला होता. Plz help
उत्तर द्याहटवामला माझ्या e-mail वर तुमचा whatsapp number पाठवा.
हटवाही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवामाझी आंगठी दि.१७/०१/२०२१ रोजी ११:०० ते १२:००च्या दरम्यान प्रवास करत असताना घरी येऊ पर्यंत हारवली आहे माझे नाव विनायक आगलावे रास नावं चिंतामणी जन्म तारीख ०५/०४/१९८१ वेळ ०३:१५ पाहटे कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
उत्तर द्याहटवाaglawevinayak@gmail.com
7499070743whatsp
उत्तर द्याहटवामाझे पाकिट 12/10/2021रोजी माहीम माटुंगा, sv रोडवर बेस्ट मध्ये चोरी झाले, वेळ दुपारी3ते4 च्या वेळेत, पैसे आणि कागदपत्रे होती, कोठे सापडेल
उत्तर द्याहटवामाझा सोन्याचा नेकलेस सापडत नाही. मी कपाटात खूप शोधले. ऊत्तर द्यावे.
उत्तर द्याहटवामाझे मंगळसूत्र काल हरवले आहे. कसे सापडेल? 🙏🏻
उत्तर द्याहटवा