रविवार, १६ नोव्हेंबर, २०१४

घर घेता येईल का?

नोकरी, धंद्याच्या निमित्ताने आपले गाव/शहर सोडून परक्या शहरात, राज्यात किंवा अगदी परदेशात जाणे ही खूप नित्याची गोष्ट झाली आहे. आपले राहते घर सोडून परक्या मुलखात नोकरी करताना कधी ना कधी तरी तेथे घर घेणे गरजेचे होते. कर्जाच्या सुलभतेमुळे तरुण वयात स्वत:चे घर घेणे शक्यही होते. परंतु पैशाची सोबत असूनही बरेच शोधून मनासारखे घर मिळतेच असे नाही. अशावेळी कुठे तडजोड करावी का, का वाट पहावी अशा द्विधा मन:स्थितीत ज्योतिषाची मदत होते.

रोहिणीला (नाव बदलले आहे) बरीच शोधाशोध केल्यावर एक घर पसंत पडले होते. पैशाची सोबत होती. अर्थात अशा घर घेऊ इच्छिणारेही पुष्कळ होते. तिने मला हे घर तिला घेता येईल का, हा प्रश्न ५ जानेवारी २०१४ रोजी रात्री ९:४७ ला केला.  त्यावेळची पुण्याची (मी जिथे तो प्रश्न सोडवला) कुंडली खाली दिली आहे.

प्रश्नकुंडली: ५/जाने/२०१४ २१:४७, पुणे
चंद्र गुरुच्या नक्षत्रात आणि गुरु लाभात म्हणजे मनातील इच्छा पूर्ण होणार का हा प्रश्न होता, पण त्याचे घराशी असलेले नाते चतुर्थाच्या उपनक्षत्रस्वामी असलेल्या चंद्राने स्पष्ट केले. प्रश्नकुंडलीची ही मजा आहे, की प्रश्नकर्त्याने जरी प्रश्न विचारला नाही तरी ज्योतिषाला तो प्रश्नकुडलीद्वारे बरोबर कळतो.

कृष्णमूर्ती ज्योतिषात हो/नाही प्रकारचे उत्तर पाहताना, त्या भावाचा उपनक्षत्रस्वामी पाहतात. हा उपनक्षत्रस्वामी आणि त्याचा उपनक्षत्रस्वामी मार्गी असून जर पूरक भावांचे कारक असतील तर हो असे उत्तर असते. या कुंडलीला चतुर्थाचा उपनक्षत्रस्वामी चंद्र वक्री गुरुच्या नक्षत्रात आहे. त्यामुळे रोहिणीला मी तुला हे घर घेता येणार नाही असे सांगितले. लाभाचा उपनक्षत्रस्वामी शनी तृतीयात आहे; तृतीयस्थान हे चतुर्थाचे व्ययस्थान. इच्छापूर्तीचे स्थान घराला नकार देत आहे म्हणजे रोहिणीचीच हे घर घ्यायची इच्छा होणार नाही. यापुढचे संवाद असे -
"तुला स्वत:लाच घर घेण्याची इच्छा होणार नाही", मी.
"मला ते घर पसंत आहे असे सांगुनही तू हे सांगतोस?", रोहिणी.
"हो, माझ्यासमोरची पत्रिकाच तसे सांगते आहे. तू तुझे प्रयत्न कर", मी.
रोहिणीला फार प्रयत्नाने पसंत पडलेले घर आपल्याला मिळणार नाही ह्याचे दु:ख होतेच. ज्योतिषाला सत्याचे कडू औषध पाजून प्रश्नकर्त्याला आगाऊ सूचना द्यावी लागते.

रोहिणीने हे घर घ्यायचा प्रस्ताव घरमालकासमोर १४ जानेवारी रोजी ठेवला आणि कर्जासाठी बोलणी सुरु केली. तिच्या कर्ज सल्लागाराने तिला १४ जानेवारी रोजी ह्या घरासाठी कर्ज घेण्यात अडचणी येतील त्यामुळे हे घर घेऊ नये असा सल्ला दिला. रोहिणीने तत्परतेने तासाभरात स्वत:हून प्रस्ताव मागे घेतला.

असे प्रश्नकर्ते मला आवडतात. ज्योतिष प्रयत्न करु नका असे कधीच सांगत नाही, उलट प्रयत्नांना योग्य काळ आणि दिशा देण्याचे काम करते. त्याचबरोबर प्रयत्नांना अपयश आले तर त्यांची कारणमीमांसा करून निराश न होण्यास मदत करते. रोहिणीला घर मिळणार नाही याची कल्पना आधीच आल्याने, तिने प्रस्ताव मागे घेतानाच पुढचे घर पहायची तयारी केली. तिने ग्रहांचा कौल पाहून तो प्रस्तावच पुढे ठेवला नसता तर तिला पसंत पडलेले घर  केवळ ज्योतिषाच्या सांगण्यावरून सोडले ही गोष्ट खात राहिली असती, आणि तसे व्हायला कारणीभूत मी झालो म्हणून मलाही!

तिच्या जन्मकुंडलीवरून मी तिला जून २०१४ ते सप्टेंबर २०१४ ह्या काळात घर घेता येईल असे सांगितले, अर्थात जन्मकुंडलीवरून निश्चित केलेल्या काळात जन्मवेळेतील फरकाप्रमाणे २-३ महिन्यांचासुद्धा फरक येऊ शकतो याची कल्पना देऊन प्रयत्न तसेच चालू ठेवण्यास सांगितले. एप्रिल २०१४ च्या सुमारास तिने दुसऱ्या घराचा व्यवहार पूर्ण केला, घरातील दुरुस्ती आणि बदल होऊन रुळण्यास जून २०१४ उजाडले.

रोहिणीची घर घेण्याची इच्छा जशी पूर्ण झाली तशी सर्व गृहेच्छुकांची होवो!
गृहचतुर्थाची कहाणी लाभोत्तरी सुफळ संपूर्ण!

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०१४

Research and experiments related to child birth

There are many systems or schools in Astrology. Each system has its own set of rules, though sometimes contradictory. Obviously, not all of them yield correct results when applied. Most of the rules are given without any theorematic treatment. That raises a question, "how does one sort the correct ones from the wrong ones?". Simple answer is to match them against the actual observations. But the method is tedious as we will see next. We started some experiments in the context of child birth esp. the first child birth. This article describes our efforts so far and some interesting outcomes.

To understand the terminology, please use the reference pages available from the sidebar.

Method

With the limited time in our hands, we could use only one system of astrology for the experiments. Given the high level of accuracy and simplicity, we chose Krishnamurti system.  We used Statistical Hypothesis Testing to validate the rules against the observations.

We use following rules from Krishnamurti's readers. We did not use the rules specifying the effects of aspects of other planets with Rahu and Ketu, and aspects of planets in general.
  1. in its Dashas, a planet indicates effects related to the house/s it signifies 
  2. A planet signifies following houses
    1. The house which it occupies
    2. The house/s it rules
    3. The house/s ruled and occupied by the lord of Nakshatra occupied by the planet.
  3. Whether the effects are desired or undesired is decided by the lord of the sub of the planet. The signification of the sub-lord is decided by rule 2.
  4. Rahu and Ketu also (apart from the rule 2) signify the houses occupied and ruled by the lord of Rashi where they are placed.
According to Krishnamurti system, dasha of planets signifying the second, fifth and eleventh houses  should run when the first child is born to a person to effect the increase in family, and child-birth to the person and its spouse. Dasha lords should transit (gochar) the nakshatras of planets signifying these houses.

Observation

We studies the horoscopes of 150 parents and their first children. The observations are as follows
  1. 85% parents had the dashas of planets signifying fifth house. The probability of running dasha of significator of the fifth house at any random time is 70% according to rules used above. Thus the hypothesis that "when first child is born the dashas of planets signifying fifth house are running" holds for the data studied with type 1 error less than 1%.
  2. We did not see such a high correlation for second and eleventh house, esp. in case of fathers. In case of mothers however second house was observed to be significant next to the fifth house.
In this case, we observed that although the rule specifies the three houses viz. second, fifth and eleventh being significant, only two houses viz second and the fifth were found to be significant in the observed data and that too for mothers. Thus the method allows validation of existing rules and at the same time shows the need for improving those rules.

Hence we are continuing the study to validate existing rules and hypothesizing new rules as needed. According to the rules of hypothesis testing, in the given context, we need samples in the range of thousand to conclusively discard or accept a hypothesis. It is possible to analyse large data within minutes using computers, so today it's possible to experiment using such methods (something which wasn't possible when Krishnamurti formulated his method). We are collecting the birth details of parents and their first children to continue our studies.

If you are interested in providing your details, please use Google Form  here.

गुरुवार, २ ऑक्टोबर, २०१४

संततियोग प्रयोग आणि संशोधन

फलज्योतिषात अनेक पद्धती प्रचलित आहेत. ह्या प्रत्येक पद्धतीत अनेक नियम आहेत, त्यातले काही परस्परविरोधीही आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे,  ह्यातल्या कित्येक (जवळजवळ सगळ्याच) नियमांना सिद्धांताची जोड दिसत नाही. एखादा नियम तसा का आहे, याचं विवेचन फारसे आढळत नाही. किंबहुना त्यामुळेच ज्योतिषाला अवैज्ञानिक शास्त्र म्हणवले जाते. यातले बरेच नियम लागू पडताना दिसतात आणि बरेच नाही. हा नीरक्षीर विवेक कसा करायचा हा मोठा प्रश्न आहे. त्याचे सोपे परंतु कष्टप्रद उत्तर म्हणजे, प्रत्यक्ष निरीक्षणांशी ज्या नियमांचा मेळ बसतो ते नियम स्वीकारणे आणि उरलेले सोडून देणे. आम्ही "प्रथम संतति कधी होते?" हा प्रश्न घेऊन हे प्रयोग सुरु केले.

या लेखात वापरलेल्या ज्योतिषीय संकल्पना समजण्यासाठी संदर्भपृष्ठांचा वापर करावा.

पद्धत

हातात असलेला वेळ आणि उपलब्ध साधने याचा विचार करता कुठल्यातरी एकाच पद्धतीचा उपयोग करणे शक्य होते. कृष्णमूर्ती ज्योतिष  पद्धतीचा सोपेपणा आणि अचूकता ह्या दोन गोष्टींचा विचार करून त्या पद्धतीनुसार प्रयोग सुरु केले. ह्या नियमांना सैद्धांतिक बैठक नसल्यामुळे, त्यांची गुणवत्ता मोजण्यासाठी Statistical Hypothesis Testing चा वापर केला. ह्या पद्धतीत एखादे गृहितक निव्वळ शक्यतेमुळे (Random Chance) खरे वाटत नाही ना हे तपासले जाते.

सध्या कृष्णमूर्ती पद्धतीची वेगवेगळी संस्करणे वापरली जातात. आम्ही कृष्णमूर्तींच्या Readers मधील खालील नियम वापरले. विशेषत: राहु, केतू यांचे ग्रहांच्या दृष्टी आणि योगांमुळे बदलणारे कारकत्त्व तसेच ग्रहांचे दृष्टी आणि योगांनी बदलणारे कारकत्त्व विचारात घेतले नाही.
  1. ग्रह त्याच्या (विंशोत्तरी) दशांमध्ये त्याच्या कारकभावांसंबंधी फळे देतो.
  2. ग्रहाचे कारकभाव पुढीलप्रमाणे
    1. ग्रह जिथे आहे ते भाव
    2. ग्रह ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
    3. ग्रहाचा नक्षत्रस्वामी जिथे आहे आणि तो ज्या भावांचा स्वामी आहे ते भाव
  3. या फळांची अनुकूलता उपनक्षत्रस्वामीवरून ठरते. उपनक्षत्रस्वामीचे कारकत्त्व वरील नियमाप्रमाणे मानावे.
  4. राहु आणि केतू त्यांच्या राशीस्वामी जिथे आहे आणि ज्या भावांचा स्वामी आहे त्या भावांचे कारक होतात.
कृष्णमूर्ती पद्धतीनुसार प्रथमसंततिच्या वेळी कुटुंबात वाढ होते, जातकाला तसेच त्याच्या जोडीदाराला पहिले अपत्य मिळते. त्यामुळे या वेळी धन, पंचम आणि लाभ या भावांच्या कारक ग्रहांच्या दशा चालू असतात.

निरीक्षणे

२०० पालक आणि त्यांच्या पहिल्या संतति यांच्या जन्मवेळा, जन्मस्थळे यांच्या माहितीवरुन त्यांच्या कुंडल्यांचा अभ्यास करून केलेली निरीक्षणे पुढीलप्रमाणे
  1. ८५% पालकांच्या बाबतीत प्रथमसंततिच्या वेळी पंचमभावच्या कारक ग्रहांच्या दशा (महा, अंत:, वि) चालू होत्या. वरील नियमांनुसार ठराविक वेळी एखाद्या भावाच्या कारक ग्रहाची दशा चालू असण्याची निव्वळ शक्यता (Probability) ७०% असते. म्हणजेच प्रथम संतति आणि पंचमभावाच्या कारक ग्रहाची दशा याचा संबंध निव्वळ शक्यतेपेक्षा जास्त आहे.
  2. धन आणि लाभ भावांबाबत मात्र हे प्रमाण कमी दिसून आले. विशेषत: वडिलांच्या बाबतीत या भावांचे प्रमाण निव्वळ शक्यतेइतकेच होते. आयांच्या बाबतीत धन भावाचे प्रमाण पंचम भावाच्या खालोखाल दिसून आले. लाभस्थानाचे प्रमाण मात्र निव्वळ शक्यतेइतकेच दिसले. म्हणजेच, आयांच्या बाबतीत धन भावाचा आणि प्रथम संततिचा संबंध दिसला, पण वडिलांच्या बाबतीत तसा तो दिसला नाही, किंबहुना पंचमभाव सोडता तो तसा कुठल्याच भावासंबंधी दिसत नाही.
सुरुवातीला म्हणल्याप्रमाणे पुस्तकातील सर्व नियम जसेच्या तसे लागू होताना दिसत नाहीत. पण लागू होणारे नियम या पद्धतीने वेगळे करता येतात. उदा. संततिसाठी पंचमभाव पहावा किंवा कुटुंबस्थानासाठी धनभाव पहावा, हे नियम पुस्तकांत मिळतात, परंतु "तसे का?" याचा विचार पुस्तकांत होताना दिसत नाही. या प्रयोगातून ते सांख्यिकीदृष्ट्या सिद्ध करणे शक्य आहे.

त्याबरोबरच ग्रहदशा, गोचर याबरोबरीने इतर कुठले घटक यावर परिणाम करतात का याचाही शोध या पद्धतीने घेता येइल. संगणकातील प्रगतीमुळे, खूप मोठ्या प्रमाणात माहितीचे विश्लेषण करणे शक्य आहे. आम्ही हाच प्रयोग मोठ्या प्रमाणावर करत आहोत. त्यासाठी सांख्यिकीच्या नियमांनुसार १००० पालक आणि त्यांच्या पहिल्या संततिच्या जन्मवेळा आणि जन्मस्थळे गोळा करत आहोत. याचा उपयोग आणखी सूक्ष्म आणि अचूक नियम मिळवण्यासाठी होइल.

आपण आपली माहिती देण्यास उत्सुक असाल तर ह्या Google Form चा वापर करा.

गुरुवार, ४ सप्टेंबर, २०१४

गणेशोत्सव आणि ज्योतिष

हिंदू धर्मातील सण हे ऋतू आणि ज्योतिषाचा विचार करून निश्चित केले आहेत. परंतु कालपरत्वे या सणांमागील विचार विसरून केवळ कर्मकांडाला आणि त्यातील मजेला प्राधान्य आले आहे. काहीवेळा ही कारणे पुराणातील गोष्टी/कहाण्या यांच्या रुपकांमध्येही हरवली आहेत. गणेश चतुर्थी हा ही एक असाच सण! या लेखात गणेशोत्सवामागील ज्योतिषात शिरण्याचा प्रयत्न केला आहे. कुठे समाधानकारक उत्तरे आहेत आणि कुठे नवीन प्रश्न!

गणेशोत्सव भाद्रपद महिन्यातील शुक्ल चतुर्थीपासून सुरु होतो तो त्या महिन्यातील शुक्ल चतुर्दशीपर्यंत चालतो. प्रत्येकच महिन्यातील चतुर्थीला गणपतीच्या नावाने व्रत/उपास करतातच. ह्या प्रथेची सुरुवात गणपती आणि चंद्राच्या कथेत आढळते. तुडुंब पोटभरून जेवून उंदरावरून निघालेल्या गणपतीची चाल पाहून चंद्र त्याला हसला. त्यामुळे गणपती रागावला आणि पुढील घटनांची परिणती चंद्राला कलांचा भोग मिळण्यात झाली, त्यातही चतुर्थीला चंद्रदर्शन करणार्यांवर खोटा आळ येईल असे सांगितले.  या गोष्टीला ज्योतिषातील काही बाबी जवळच्या वाटतात, त्या पुढीलप्रमाणे,
  1. मंगळ ह्या पहिल्या बाह्य ग्रहाची पृथ्वीसापेक्ष गती गमतीशीर आहे - हा ग्रह साधारणपणे दीड महिन्यात एक रास, म्हणजे क्रांतीवृत्तावरचे ३० अंश ओलांडतो. या वेळी त्याच्या भासमानभ्रमणाची दिशा चंद्रसूर्यांच्या भासमानभ्रमणाच्या दिशेप्रमाणे असते. परंतु साधारण दर दोन वर्षांनी ती दिशा विपरीत होते (ज्योतिषाच्या भाषेत मंगळ वक्री होतो). त्यावेळी त्याला एक रास ओलांडायला साधारण पाच महिने लागतात, म्हणजे गती साधारण तिपटीने कमी होते. हा एकच ग्रह असा अाहे की ज्याच्या वक्री आणि सरल गतीत एवढा फरक आहे. ज्योतिषानुसार गणपतीला मंगळाची देवता मानतात. त्याचे वाहन उंदीर. उंदराची सामान्य गती खूप जास्त असते पण तुडुंब पोट भरलेल्या गणपतीला वाहून नेताना मात्र ती एकदम कमी झाल्यास नवल कसले आणि ते पाहून सर्वात गतिवान असलेला ग्रह चंद्र हसला तर नवल ते काय? चंद्राच्या कला आणि मंगळाची मंद विपरीत गती यांचा संबंध असल्याचे सूचित होते पण सध्याच्या ज्योतिर्विज्ञानात हा संबंध सापडत नाही.
  2. चंद्र आणि शुक्र, बुध हे अंतर्ग्रह यांच्या कला दिसतात. मंगळ हा सूर्यापासून पहिला ग्रह अाहे ज्याच्या कला दिसत नाहीत. त्यामुळे मंगळाच्या, पर्यायाने गणपतीच्या शापाने त्या कला दिसतात म्हणण्यात कथालेखकाचा उत्तम कल्पनाविलास दिसतो.
  3. एक तिथी म्हणजे चंद्राचे सूर्यापासून १२ अंशांचे अंतर असते. प्रथमा ० ते १२ अंश, द्वितीया १२ ते २४ अंश, तृतीया २४ ते ३६ अंश, चतुर्थी ३६ ते ४८ अंश आणि पंचमी ४८ ते ६० अंश. यापैकी चतुर्थीला (खरेतर काही तृतीयेचा काळ आणि काही पंचमीचा काळ) चंद्रापासून सूर्य (म्हणजे चंद्राच्या प्रकाशाचा स्त्रोत) ३० अंशांपेक्षा जास्त मागे असतो, म्हणजेच ज्योतिषानुसार व्ययभावात असतो. व्ययभाव हा तुरुंग, आरोप, खोटे आळ, मानहानी यांचा कारक आहे. हेच चतुर्थीच्या चंद्राला पाहिल्यावर चोरीचा आळ येतो या समजुतीमागचे कारण असावे. ज्योतिषानुसार चोरीचा आळ यायला एवढेच पुरेसे नाही आणि दरवेळी चतुर्थीचा चंद्र पाहून चोरीचा आळ येत नाही हे आपण आपलेही अनुभवू शकतो.
गणपती आणि मंगळाचा संबंध अथर्वशीर्षातील पुढील श्लोकावरून कळेल,
एकदन्तं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणं रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम्।
रक्तं लम्बोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससं रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पै: सुपुजितम्।
गणपती हा चार हातांपैकी दोन हातात शस्त्र, तिसऱ्या हातात असुराशी युद्ध करताना तुटलेला दात, लाल रंगाचा, लाल गोष्टी आवडणारा असा युद्धाचा देव आहे. मंगळ हा ज्योतिषानुसार युद्धाचा कारक आणि लाल ग्रह आहे. फक्त मंगळ हा काटक, बलवान असा दाखवला आहे तर गणपती स्थूल!

गणपती आणि मंगळाच्या या ज्योतिषातील संबंधामुळे, चतुर्थीचा मंगळाशी संबंध आला ती विशेष होते, उदा. चतुर्थी मंगळवारी आली की अंगारक योग होतो. भाद्रपद महिन्याची पौर्णिमा पूर्वाभाद्रपदा किंवा उत्तराभाद्रपदा या नक्षत्रांमध्ये असते (म्हणून महिन्याचे नाव भाद्रपद). पौर्णिमेच्या आधी साधारण ११ दिवस चतुर्थी असते. चंद्र साधारण एका दिवसात एक नक्षत्र ओलांडतो, ११ दिवसांत मागे ११ नक्षत्रे मागे गेल्यास ल्यास, भाद्रपद शुक्ल चतुर्थीच्या दिवसभरात कधीतरी चंद्र चित्रा या मंगळाच्या नक्षत्रात असतो. दिवसापेक्षा नक्षत्र अधिक फलदायी त्यामुळे हा मुहूर्त गणपतीपूजेसाठी अंगारक योगापेक्षा जास्त फलदायी (अर्थात इतर ग्रहस्थितीनुसार फरक पडतोच).  म्हणून या मुहूर्तावर गणेशाची एकापेक्षा जास्त दिवस उपासना करायचे व्रत सुरु होते.

असेच चतुर्थीला मंगळाचे नक्षत्र वैशाख (मृग नक्षत्र) अाणि पौष महिन्यात (धनिष्ठा) येते, पण त्या वेळी काही विशेष व्रत होत नाही. यामागे कदाचित तेव्हाचे ऋतू कारणीभूत असतील किंवा चित्रा नक्षत्रात काहीतरी विशेष असेल, ज्याची हे व्रत या महिन्यात योजणाऱ्यांना माहिती होती आणि आता ती विस्मृतीत गेली आहे.

त्याचबरोबर चतुर्थीचा आणि गणपतीचा संबंध काय किंवा चतुर्थी गणपतीला का प्रिय याचे समाधानकारक उत्तर मला सापडले नाही. एका त्रोटक संदर्भाप्रमाणे ज्याप्रमाणे ग्रहांना देवता दिलेल्या आहेत, त्याप्रमाणे तिथींनाही देवता आहेत आणि चतुर्थीची देवता गणपती आहे. ग्रहांचा देवतांशी संबंध लावताना, ग्रह आणि देवता यांच्या गुणधर्मातील साम्य वरीलप्रमाणे लक्षात घेतले आहे. परंतु तिथी ही चंद्रसूर्यातील अंशात्मक अंतरावरून ठरते, ज्यावरून ग्रहयोग ठरवतात. ग्रहयोगांचे गुणधर्म त्या त्या ग्रहांवर अवलंबून असतात. चंद्रसूर्यातील अर्धकेंद्रयोग (४५ अंशाचा योग, जो चतुर्थीला होतो) अाणि गणपती यांत कुठले साधर्म्य आहे याचे विश्लेषण मला सापडले नाही.

गणेशोत्सवामागचे किंवा गणेशोत्सवदर्शित ज्योतिष शोधण्याचा माझा हा अल्प प्रयत्न. यातील बरीच माहिती वेगवेगळी विखुरलेली मिळाली ती इथे एकत्र केली आहे. याबद्दल अधिक माहितीचे, मतांचे स्वागत आहे.

संदर्भ:
१. दाते पंचांग, कृष्णमूर्ती पंचांग
२. कुंडली तंत्र आणि मंत्र - भाग १, व. दा. भट


शनिवार, २३ ऑगस्ट, २०१४

डॉ. दाभोळकरांचे मारेकरी सापडतील का?

मागील लेखांमध्ये आपण वस्तू कशा शोधायच्या हे पाहिले. तेच नियम व्यक्ती शोधण्यासही लागू होतात, फक्त त्या लेखात म्हटल्याप्रमाणे राशी आणि ग्रहांचे कारकत्व व्यक्तीनुसार योजावे लागते. उदाहरणार्थ, प्रश्नकुंडलीत चंद्र जर वृश्चिक राशीत असेल तर दरी किंवा निदान माणूस मावू शकेल इतकी मोठी घळ असली पाहिजे, चंद्राबरोबर बुध असेल तर हरवलेल्या व्यक्तीबरोबर एखादे लहान मूल किंवा प्रश्नकर्त्याच्या अाजोळची व्यक्ती असण्याची शक्यता असू शकते. व्यक्तीच्या बाबतीत वृश्चिकेसाठी छोटी सापट अाणि बुधासाठी पुस्तक योजणे बरोबर नाही.

एक वर्षापूर्वी डॉ. दाभोळकरांच्या हत्येने पुण्यात मोठी खळबळ उडवली होती. तेव्हा माझ्या एका ओळखीच्या व्यक्तीने मला मारेकरी मिळतील का, कुठे मिळतील? असा प्रश्न केला काळजीतून केला होता. या व्यक्तीचा दाभोळकरांशी, त्यांच्या कार्याशी अथवा पोलिसांशी काहीही संबंध नव्हता अाणि अाजही नाही. सकृतदर्शनी केवळ विचार पटले नाहीत किंवा विचारांच्या पातळीवर विरोध होता, म्हणून कोणाची हत्या, तीही पुण्यात होईल हे धक्कादायक होते. सामान्य लोकांना अापल्या जिवाची काळजी न वाटती तर नवलच. निदान असे प्रकार पुढे न होण्यासाठी तरी मारेकरी सापडावेत, हत्येचा हेतू कळावा असे वाटले तर नवल नाही.

या प्रश्नाची भावचलित कुंडली पुढीलप्रमाणे,

प्रश्नकुंडली: १ सप्टेंबर २०१३, १८:०९, पुणे
चंद्र नवमस्थानी कर्क राशीत, पुनर्वसू नक्षत्रात, कर्क नवमांशात चंद्राच्या उपनक्षत्रात अाहे. तिथे त्याबरोबर मंगळ अाणि गुरु अाहेत. चंद्राचा भाव, रास अाणि त्याच्याशी संबंधित ग्रह यातून मारेकऱ्याचे प्रश्न विचारण्याच्या वेळचे स्थान अाणि तेव्हा त्याच्याबरोबर असलेल्या व्यक्ती यांच्याबद्दलचे निष्कर्ष धक्कादायक असल्याने तो कुठे अाहे हे सांगणे मी टाळले. इथेही मी ते लिहित नाही. सूज्ञ वाचक संदर्भपृष्ठांचा वापर करून ते ओळखतीलच! पण ते पाहिल्यावर मी हे मारेकरी मिळणार नाहीत, असे सांगितले. अाज वर्ष होत अाले तरीही ते मिळालेले नाहीत हे सर्वज्ञात आहे.

डॉक्टरांनी केलेलं कार्य खूप मोठं आणि आजच्या काळात गरजेचंही (अगदी ह्या ब्लॉगच्या विषयाला सकृतीदर्शनी विरोधी असलं तरीही). ह्या लेखाच्या निमित्ताने त्यांच्या पहिल्या पुण्यतिथीला त्यांच्या कार्याला आणि स्मृतीला नम्र श्रद्धांजली!

शुक्रवार, २२ ऑगस्ट, २०१४

Lost and found: the astrology way

Easiest and most useful application of astrology is finding the lost objects. It's worth studying basic astrology, at least to find our own lost objects. This article explains the same with examples.

Method

There are quite a few methods of finding lost objects in various systems of astrology. I am explaining a method which is very simple and yet very effective.

Astrologer is to cast the horoscope at a time when he is posed a query about lost object using the place where the astrologer is (rather than where the object was lost or where the querier is). The Moon's position in this horoscope gives clues as to where the object is. The Moon's position is to be used as per the following rules -
  1. Signification of the Moon - Since this is a horary chart, the Moon should be significator of the house which indicates the lost object. For example, second house if jewelry is lost, third house for lost documents etc. Usually the Moon himself is in house signifying the lost of object or Karka rules that house. If the Moon is not significator of relevant house, the horoscope can not be used for answering the question.
  2. Moon's house - House where the Moon is indicates the place where the object is. For example, a Moon in fifth house indicates the children or the play house or a Moon in the twelfth house indicates the bedroom and so on. A chart here lists the places indicated by various houses.
  3. Moon's sign (Nirayana) - Like Moon's house, its sign also indicates a place. Hence one has to combine both the indication to infer the right place. The sign also indicates the color of the enclosure if the object is hidden inside an envelop, bag, trunk or a room. The chart here lists the places and colors indicated by Nirayana signs. For example, for a Moon in Meena and twelfth house, both house and sign indicate the bedroom. In such a case, the object can be found in the bedroom near a water container or near fish-tank or inside a green bag.
  4. Moon's star (Nakshatra) - Like the sign, Moon's star indicates the color of the enclosure. It also indicates person/s possessing the object or in some way related to the loss. The person or color should be inferred according to the properties of the lord of star.
  5. Moon's navamamsha - This can be used to further clarify the place indicated by the house and the sign. It's signification is same as the signs.
  6. The planets aspecting the Moon - The planets forming aspects with the Moon indicate the objects nearby the lost object. Such objects should inferred according to the signification and colors of planets as found in the chart here.
These six indications should be combined to predict the place where the lost object can be found. One has to apply common sense while coming to a final answer. For example, if the Moon is in Vrishchika the size of the gap or the trench should be decided based on the size of the lost object. The table below contains some examples.

    Some statistics

    I have total of 24 horoscopes for lost objects. Out of those, in 13 cases the objects were found and amongst those in 12 cases, they were found at the places indicated by the Moon's position.

    We have not tackled the question of whether we will be able to find the object or not here. That's topic of some other article.

    Examples


    Time and place of query Moon's position Moon's aspects The place where object was found
    House Sign Star Navamamsha
    27/Jun/2012 21:29:00, Pune 8 Kannya Hasta Mithun Mars, Saturn In a chest full of books (Mithun) near the floor (Kannya), in a gap (8th house) between a black (Saturn) and a Red (Mars) object.
    22/Mar/2012 19:32:00, Pune 6 Meena U. Bhaa Kannya Sun, Mercury In the bedroom (Meena), near the floor (Kannya), with other documents (Mercury) containing some documents from government (Sun).
    14/Apr/2014 10:14:00, Pune 4 Kannya Hasta Mithun Mars, Jupiter In a cupboard near a box containing medicines (Kannya), in a white bag (Hasta), near another red object (Mars), in almost vacant compartment (Mithun), in a room containing religious books (Jupiter)
    3/Jul/2013 19:44:00, Pune 12 Mesha Ashwini Mithun Saturn, Mercury, Sun, Ketu In bedroom (12th house), near the ceiling in a red box (Mesha), with a black (Saturn), an Orange (Ketu) object, and medicines (Sun and Mercury)

    रविवार, ३ ऑगस्ट, २०१४

    हरवलेल्या वस्तूंचा शोध

    फलज्योतिषाचा सर्वात सोपा आणि खूप वेळा करावा लागणारा उपयोग म्हणजे हरवलेल्या वस्तू शोधणे. निदान आपल्या हरवलेल्या वस्तू शोधण्यासाठी तरी ज्योतिषाचा अभ्यास जरूर करावा. बऱ्याचदा एखादी वस्तू डाव्या-उजव्या हाताने किंवा पुन्हा लागली तर "सापडायला सोप्या" अशा विवक्षित ठिकाणी आपण ठेवतो, नंतर जेव्हा त्या वस्तूची अत्यंत गरज असते तेव्हा ती विवक्षित जागाच "सापडत" नाही; ऐन मोक्याच्या वेळी आपली स्मरणशक्ती दगा देते. वस्तू हरवल्या किंवा सापडत नसल्या की कुठे शोधायला सुरुवात करावी इथपासून सुरुवात असते. अशा वेळी, अगदी लहान वाटणारी आपली खोलीदेखील, जगाएवढी भासायला लागते. जर घरात ज्योतिषाची प्राथमिक माहिती असलेली व्यक्ती असेल तर निदान ती वस्तू कुठे असेल, याचा सुगावा ती व्यक्ती देऊ शकते.

    पद्धत

    हरवलेल्या वस्तू सापडवण्याच्या अनेक पद्धती ज्योतिषात आहेत, त्यापैकी माझ्या दृष्टीने सोपी आणि जास्त बरोबर उत्तरे देणारी पद्धत येथे देत आहे.

    ज्योतिषाला जेव्हा अमूक वस्तू कुठे सापडेल, असा प्रश्न केला जातो, तेव्हा त्या वेळची, ज्योतिषी जिथे असेल त्या स्थळाची कुंडली मांडून, त्या कुंडलीतील चंद्राच्या स्थानावरून, हरवलेली वस्तू कुठे असेल त्याचा अंदाज बांधावा. हा अंदाज बांधताना, चंद्राच्या स्थानाचा खालीलप्रमाणे उपयोग करावा - 
    1. चंद्राचे कारकत्त्व - ही प्रश्नकुंडली असल्याने, चंद्र हा हरवलेल्या वस्तूशी संबंधित भावाचा कारक असावा लागतो. उदा. सोन्याचे दागिने हरवल्यास धनभाव, मंगळसूत्र हरवल्यास अष्टमभाव, कागदपत्रे हरवल्यास तृतीयभाव इ. त्यामुळे बऱ्याचदा कर्क रास किंवा चंद्र स्वत: त्या वस्तूशी संबंधित भावात दिसतो. तसा तो कारक नसल्यास, ही कुंडली हरवलेल्या वस्तूची जागा सुचवण्यास उपयोगी नसते.
    2. चंद्राचा भाव - चंद्र ज्या भावात असेल त्या भावानुसार वस्तूचे ठिकाण योजावे. उदा. पंचमभावात असेल तर स्वत:च्या मुलांकडे किंवा खेळणी ठेवायच्या जागी, व्ययात असेल तर झोपायच्या खोलीत वगैरे. भावानुसार जागा कशा योजाव्यात ह्याची माहिती इथे पहा.
    3. चंद्राची रास - भावाप्रमाणेच रासही वस्तूचे ठिकाण सुचवते. रास आणि भाव या दोन्ही गोष्टींचा विचार तारतम्याने करावा लागतो. त्याचबरोबर रास आणि चंद्राचे नक्षत्र ती वस्तू जर एखाद्या वेष्टनात, पिशवीत किंवा पेटीत असेल तर त्या वेष्टनाचा रंगही दाखवते. राशीनुसार जागा कशा योजाव्यात हे इथे पहा. उदा. चंद्र मीन राशीत व्ययभावात असेल तर रास अाणि भाव दोन्ही झोपण्याची जागा दाखवतात. अशावेळी, झोपण्याच्या खोलीत, हिरव्या रंगाच्या पिशवीत किंवा पाण्याच्या भांड्याशेजारी वस्तू असण्याची शक्यता असते.
    4. चंद्राचे नक्षत्र - राशीप्रमाणे नक्षत्र वस्तूच्या आच्छादनाचा रंग दाखवते. तसेच कधी ते वस्तूशी संबंधित व्यक्ती दाखवते. चंद्र ज्या नक्षत्रात अाहे, त्याच्या स्वामीनुसार रंग किंवा व्यक्तीची योजना असते.
    5. चंद्राचा नवमांश - चंद्र ज्या नवमांशात आहे, त्याचा उपयोग रास आणि भावाने दाखवलेली जागा अधिक सूक्ष्म करण्यास करावा. त्याची योजना राशीच्या कारकत्वाप्रमाणेच करावी.
    6. चंद्राबरोबर किंवा त्याच्याशी योग करणारे ग्रह - ग्रह साधारणपणे हरवलेली वस्तू ज्या जागी आहे, त्याच्या आसपासच्या इतर वस्तू दाखवतात. प्रत्येक ग्रहाच्या कारकत्त्वानुसार आणि रंगानुसार या वस्तू योजाव्यात. ग्रहांचे कारकत्व आणि रंग इथे पहा.
    या सहा गोष्टींचा एकमेकांशी तारतम्याने संबंध लावून वस्तू कुठे सापडेल याबद्दल अनुमान काढता येते. उदा. चंद्र वृश्चिकेत असेल तर वस्तू किती मोठी‌ आहे यावरून ती अडकलेली फट किती‌ मोठी‌ असेल हा अंदाज येईल, किंवा ती‌ कुठल्या पेटीत किंवा वेष्टनात असेल ते पाहता येईल.
    पुढील तक्त्यात काही हरवलेल्या वस्तू कुठे सापडल्या आणि त्यासंबंधी प्रश्नकुंडलीत चंद्राचे स्थान काय होते त्याची उदाहरणे दिली आहेत.

    या पद्धतीचे यशापयश

    माझ्याकडे असलेल्या एकूण २३ हरवून नंतर सापडलेल्या वस्तूंबाबतच्या प्रश्नकुंडल्या आहेत; पैकी १२ वेळा वस्तू वर सांगितल्याप्रमाणे सापडल्या आहेत. ही संख्या ह्या पद्धतीची परिणामकारकता अधोरेखित करण्यास पुरेशी आहे.

    ह्या लेखात वस्तू मिळेल का ह्या प्रश्नाचे उत्तर कसे द्यावे ह्यासंबंधी माहिती नाही. ती माहिती पुऩ्हा कधीतरी लिहीन.

    उदाहरणे


    प्रश्न विचारण्याची वेळ, स्थळ चंद्राचे स्थान चंद्राचे ग्रहांशी योग वस्तू सापडलेली जागा
    भाव रास नक्षत्र नवमांश
    27/Jun/2012 21:29:00, पुणे अष्टम कन्या हस्त मिथुन मंगळ, शनि जमिनीलगतचे (कन्या) पुस्तकांचे कपाट (मिथुन), लाल (मंगळ) आणि काळ्या (शनि) रंगाच्या वस्तूंच्या मधल्या सापटीत (अष्टम)
    22/Mar/2012 19:32:00, पुणे षष्ठ मीन .भा. कन्या रवि, बुध झोपायच्या खोलीत (मीन रास), जमिनीलगतच्या कपाटात (कन्या नवमांश), इतर कागदपत्रांबरोबर (बुध) ज्यात सरकारी कागदपत्रं (रवि)‌ होती
    14/Apr/2014 10:14:00, पुणे चतुर्थ कन्या हस्त मिथुन मंगळ, गुरु कपाटात औषधांच्या डब्याजवळ (कन्या), पांढऱ्या रंगाच्या (हस्त) पिशवीत, लाल पिशवीजवळ (मंगळ), रिकाम्या कप्प्यात (मिथुन) दासबोध (गुरु) असलेल्या खोलीत
    3/Jul/2013 19:44:00, पुणे व्यय मेष अश्विनी मिथुन शनि, बुध, रवि, केतू झोपायच्या खोलीत (व्यय), छताजवळ (मेष), लाल रंगाच्या पेटीत, काळ्या (शनि), केशरी (केतू) पिशव्यांबरोबर, औषधांबरोबर (रवि, बुध)

    गुरुवार, १० जुलै, २०१४

    Hello

    An astrologer usually answers queries from many different fields, medicine, agriculture, commerce, household and so on. He has only twelve planets, floating in zodiac and moving through twelve houses, to help him. Obviously, the journey of an astrologer after casting the horoscope till the query is answered, can be compared to that of a detective solving a case. Sometimes the accuracy of his own prediction astonishes the astrologer and sometime a failed prediction shakes his faith. So, an astrologer has very interesting stories to tell. We will have such stories on this blog, but I am more interested in the examining the scientific basis of astrology.

    When the opportunity presents itself, I experiment to examine the truth behind various rules in the system of astrology. Hence the name of blog, "Experimenting with Luminaries". I will be happy if this blog turns out to be a platform for such discussions. Everybody with intention to experiment is welcome here.

    I am expecting the blog to bilingual, with posts both in English and मराठी, so that more people can read it.

    Enough for the first English post.

    प्रयोजन

    ज्योतिषाकडे सल्ला मागायला येणाऱ्यांत अनेक क्षेत्रांतले, वेगवेगळ्या वयाचे लोक असतात. त्यांच्या समस्यांचे विषयही अनेकविध, अगदी लग्न किंवा मूल कधी होईल पासून ते बाजारात अडकलेला शेंगदाणा कधी विकला जाईल इथपर्यंत. ह्या अनेकविध विषयांवरच्या प्रश्नांना उत्तरं द्यायला ज्योतिषाला मदत करतात ते फक्त बारा ग्रह, बारा राशी आणि बारा घरं. पत्रिका मांडल्यापासून ती सोडवून उत्तरं शोधण्यापर्यंतचा प्रवास एखादं अवघड प्रमेय सोडवण्याइतकाच रंजक आणि कधी कधी बुद्धीला ताण देणारा असतो. दिलेल्या उत्तरांची‌ अचूकता कधी कधी ज्योतिषालाही‌ चकित करते आणि जेव्हा उत्तरं पूर्ण चुकतात तेव्हा ज्योतिषी‌ तितकाच गोंधळूनही जातो. त्यामुळे ज्योतिषाच्या कथा युद्धाच्या कथांप्रमाणेच रम्य असतात. अशा कथा या ब्लॉगवर आपण पाहूच पण त्याहूनही जास्त मला ज्योतिषाच्या वैज्ञानिक मांडणीत जास्त रस आहे.

    ज्योतिषासंबंधी वेगवेगळे प्रयोग करून वेगवेगळ्या पुस्तकात दिलेल्या नियमांची सत्यता पडताळणे हा माझा छंद आहे. अशा प्रयोगांविषयी लेख ह्या ब्लॉगमध्ये वाचाल. किंबहुना, त्यामुळेच या ब्लॉगचे नाव "ज्योतींची प्रयोगशाळा" असे ठेवले आहे. ह्या ब्लॉगद्वारे अशा प्रयोगांना आणि त्यासंबंधीच्या चर्चेला व्यासपीठ मिळाले तर उत्तमच. अशा प्रकारचे प्रयोग करणाऱ्यांचं‌ इथे स्वागत आहे. या ब्लॉगच्या माध्यमातून आपले प्रयोग मांडायचे असतील तर मला जरूर कळवा.

    नमनाला एवढं तेल पुरे.